STORYMIRROR

शुभांगी कोतवाल

Abstract Inspirational

4  

शुभांगी कोतवाल

Abstract Inspirational

आदिवासी

आदिवासी

4 mins
340

विविध समाजातील लोकांबद्दल जाणून घेण्याची एक जिज्ञासा माझ्यात असल्यामुळे , आणि काही कारणामुळे प्रवास करताना बऱ्याचदा नवीन लोकांशी बोलण्याचा प्रसंग येतोच .  असाच हा एक आदिवासी समाज . त्यांचा पेहरावा , रहाणी , त्यांचं अजिविजेकेच साधन आणि इतर बऱ्याच गोष्टी जाणण्याची संधी मिळत राहिली .

गुजरात मध्ये दाहोद , छोटा उदयपूर , कवांट व त्या आजूबाजूचा पुष्कळसा भाग जिथे अजूनही फारशा सोयी नाहीत , जंगली असा हा विस्तार आहे . त्यांना पूर्वी भिल्ल म्हणून पण ओळखलं जात असे , किंवा अजूनही काही भागात असू शकतील . त्यांचा व्यवसाय जंगली प्राण्यांचा शिकार , तो ही तिर -कामट्याने करून उदरभरण करणे हा होता . पण आता सरकारने शिकारीवर बंदी घातल्यामुळे शेती करणे हा व्यवसाय त्यांनी पत्करला असावा .

सामान्य परिस्थीतीतले आदिवासीं कुटुंब कच्च्या ll राहताना आढळतात , जी माती. - शेणानी सारवली जातात . मोकळ्या , शहरांपासून दूर , डोंगर आणि हिरवळ म्हणजे जंगला सारख्या ठिकाणी ते राहाणे पसंद करतात . काही वेळा जंगलात हिंस्र पशु देखील असतात त्यामुळे घराचे खिडक्या दारे मजबूत असावे लागतात . आणि संध्याकाळ होताच सर्व आपापल्या घरात राहतात .

आदिवासी लोकं शरीराने मजबूत असतात कारण गावासारख्या ठिकाणी जिथे थंडी , पाऊस , उन्हाळा सर्वच ऋतू जास्त जाणवतात . साधी रहाणी , मकई, ज्वारी- बाजरीची भाकरी व ताजी भाजी , मिरची हा त्यांचा रोजचा आहार . लहानपणापासून मुलांना , खूप थंडी , पाऊस सहन करायची सवय लावली जाते . थंड पाण्याने आंघोळ , लोकरीच्या कपड्यांचा जास्त वापर न करणं ह्याची सवय असते .

 सहसा नातेवाईक - आप्त एकाच गावात असतात . शेती व त्याच्याशी निगडीत काम करणे आणि त्याशिवाय जी तरुण पिढी आहे ती मजुरी करणे पत्करतात . 

महिने - महिने घरापासून दूर राहून ते शहरात कॉन्ट्रॅक्ट वर मजुरीचे रोजने मिळणारे काम जसे की रस्ते बनवणे , घरांच बांधकाम , ब्रीज चे काम , रेल्वे ट्रॅक , प्लॅटफॉर्म व त्याशी निगडीत कामे करतात . शिक्षणाचा अभाव , पैशाचा अभाव व पिढ्यान् पिढ्या चालत असणारं काम ते चालू ठेवतात . 

म्हणजे कुटुंबात जर आईवडील , दोन - तीन भावंडं असतील तर आईवडील आणि एखादा मुलगा आणि त्याचे कुटुंब गावात राहून शेती , घर सांभाळतात. तर दुसरी भावंडं गावोगावी म्हणजे शहरात मिळेल तिथे काम करून , मिळेल त्या ठिकाणी राहून व कामाची जागा बदलली की परत सामान घेवून त्या ठिकाणी स्थलांतर करतात . सणावारी किंवा पावसाळ्यात जेव्हा काम नसते तेव्हा गावाला आपल्या घरी जातात.

लग्न तशी कमी वयातच म्हणजे साधारण १८ वर्षात लावून दिली जातात . एका गावात राहणाऱ्या मुला मुलींची लग्न होत नाही कारण गाव म्हणजे एक मोठं कुटुंब मानलं जातं . आणि मुली लग्ना नंतर खऱ्या अर्थाने अर्धांगिनी असतात . जिथे नवरा जाईल तिथे त्याच्याबरोबर राहून आणि रोजावर कामाला हातभार लावतात . काही वेळा तर लहान मुलांना सांभाळून मजुरी पण करतात . 

कौतुकाचा भाग म्हणजे त्यांची नियत साफ असते . जरी शिक्षण नाही तरी महेनत मजुरी करतील पण चोरी लबाडी करत नाही . कोणी आपल्याला काही देईल का, मजुरी व्यतिरिक्त अशी आशा किंवा अपेक्षा नसते . जे मिळेल त्यात आनंदी आणि समाधानी राहायचं , कुटुंबाची काळजी घ्यायची , आणि कामाचा भार विसरून हसत मजेत राहायचं अशी वृत्ति असते .

कॉलेज मध्ये शिकत असताना अशाच एका आदिवासी गावात दहा दिवस एन.. एस. एम .चा कॅम्प असल्यामुळे राहायची संधी मिळाली . धनपरी हे त्या गावाचं नाव होतं . तिथे गावाच्या मुख्याच्या घरी राहायला आम्हा विद्यार्थ्यांना जागा दिली होती .ते त्यांचं राहतं घर असल्यामुळे ज्यांची जीवनशैली जवळून बघायला मिळाली .

आपण म्हणतो त्यांचं शिक्षण कमी , ते मागासलेले , पण तरूण - तरुणींना स्वतःचा जोडीदार स्वतः निवडण्याची संधी दिली जात होती .अर्थात त्यांचे जे काही नियम असतील , म्हणजे जोडीदार दुसऱ्या गावात राहणारा हवा , किंवा जे काही जात - धर्म हे नियम सांभाळून . म्हणजे तिथे मेळ्यात मुलं - मुली पसंतीच्या व्यक्तीला गूळ देवून आपली आवड व्यक्त करतात आणि समोरून मुलानी - मुलीनी आपला होकार देण्यासाठी तसाच प्रतिसाद म्हणजे गूळ दिला जातो . आणि मग घरचे मोठे मंडळी मिळून भेटून लग्न ठरवलं जात असे . म्हणजे किती सुधारक विचार , नाही का ? 

थोडक्यात म्हणजे त्यांना आपल्यातली शिक्षणाची व इतर कमतरता माहीत असून त्याचा स्वीकार करून ते आपापलं काम करून उदर निर्वाह करत असतात . आणि प्रत्येक पाच सहा गावं मिळून जे त्या परिसरात थोड मोठं गाव किंवा जिल्ह्याच ठिकाण जिथे रोजच्या लागणाऱ्या वस्तू , धान्य व इतर बाजार उपलब्ध असेल तिथून खरेदी करून जीवन व्यतीत करतात .अर्थात आता डिस्पेन्सरी , बँका व इतर सोयी मोठ्या व जिल्ह्याच्या गावात उपलब्ध असतात . 

पण माझ्या मते आणि मी पाहिलेला हा आदिवासी समाज म्हणजे प्रामाणिक , मेहनती , कुटुंबप्रिय व आनंदाने आपलं जीवन व्यतीत करणारा असतो .



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract