STORYMIRROR

शुभांगी कोतवाल

Abstract Others

3  

शुभांगी कोतवाल

Abstract Others

शास्त्र आणि शिस्त

शास्त्र आणि शिस्त

4 mins
20

 रोहन आणि यश हे दोघं अगदी शेजारी राहणारे मित्र . एकाच वयाचे आणि एकाच शाळेत ते दोघं शिकत होते . ते शाळेतून घरी बस मध्ये येत असत. रोहनच्या घरी त्याचे आई वडील आणि एक लहान बहीण होती तर यशच्या घरी त्याचे आईवडील आणि त्याची आजी रहात असत. 

रोहन घरी आला की त्याची आई त्याला स्कूल बॅग नीट जागेवर ठेव , युनिफॉर्म बदल , हातपाय तोंड स्वच्छ धुवून मग जेवायला ये असं सांगत असे , त्यानी ऐकलं नाही कधी तर अंगावर ओरडत असे . तर यशला काही ओरडायची गरजच पडत नव्हती कारण त्याच्या आजीने त्याला समजावून सांगितले होते .

त्यामुळे शिस्त ही कृत्रिम असते , आणि लहान मुलं थोडे मनासारखं वागणारे असतात पण हेच जर त्यांना कोणी समजावून सांगितले , एखाद्या गोष्टीचं महत्त्व पटवून दिले तर ते तसं वागतात . तसा वर-वर पाहता शास्त्र आणि शिस्त ह्यामध्ये फारसा फरक नाही . पण शास्त्र हे तर्क संगत असते तर शिस्त हे एकप्रकारे नियम आणि सातत्य ह्याचा एक भाग आहे .

लहान मुलं असो अथवा कोणीही असो जेव्हा काही गोष्टी पटवून सांगितल्या जातात तेव्हा त्या मनाला पटतात . इथेच जर रोहनची आई त्याला समजावून सांगत असती , की जेव्हा आपण बाहेरून घरी येतो तेव्हा बाहेरचे जंतू आत प्रवेश करू नये म्हणून हात पाय तोंड स्वच्छ धुवून घ्यावे . तसेच युनिफॉर्म बदलून मग लहान बहिणीशी खेळावे जेणे करून तिलाही त्या जंतू , धूळ ह्याचा त्रास होणार नाही . तसेच जेवण करताना आपले हात स्वच्छ असायला हवे . 

तसेच आपण जेव्हा बाहेरून येतो तेव्हा कधी उन्हातून आलो तर शरीराचं तापमान थोडं वाढतं आणि त्यासाठी पाण्याने हातपाय धुतले तर ते परत व्यवस्थित येतं . 

जेवणाचं ही तसच शास्त्र आहे . हाताने जेवणं हे शास्त्रसंगत आहे . कारण आपल्या बोटांना ते स्पर्शाने कळतं की अन्न जास्त गरम तर नाही नं म्हणजे ते ग्रहण करण्या योग्य आहे नां , नाहीतर आपली जीभ भाजेल . जेवणाचं ताट वाढायचं पण शास्त्र आहे . डाव्या बाजूला वरती मीठ त्यानंतर लिंबाची फोड , चटण्या , कोशिंबिरी म्हणजे सलाड वाढण्याची पद्धत तर असं का ? नैवेद्य , पंगतीचं जेवण , कुळधर्म कुळाचार ह्यावेळेस वाढताना ह्याचं अनुसरण केलं जातं. रोजच्या जेवणातही बहुतेक अशी पद्धत अनुसरली जाते . 

तर जे डाव्या बाजूला वाढले जाणारे पदार्थ असतात ते बहुतेक न शिजवता बनणारे आणि त्याचं प्रमाण आपल्या जेवणात असं असतं की ते शक्यतोवर सुरुवातीला वाढलं जातं त्यानंतर परत वाढायची गरज पडत नाही . उजव्या बाजूला भाज्या , साधारण वरती म्हणजे मिठाच्या दुसऱ्या बाजूला भजी, वडे , पापड कुरडई असे तळलेले पदार्थ . भाज्या , आमटी हे पदार्थ पुन्हा लागतात जेवणात आणि वाढले जातात म्हणून ते उजव्या बाजूला कारण ते जेवण करणाऱ्याला सोपं जातं. आणि प्रत्येक पदार्थाची जागा नक्की असल्यामुळे वाढणाऱ्या साठी सोयीचं होतं. 

 मध्यभागी भात , वरण आणि भाताच्या बाजूला पोळीची घडी आणि त्यावर गोड पदार्थ . जेवायला बसायच्या वेळी भातवरणा वर साजूक तूप . तेही शास्त्र आहे कारण जेवण करणे हे एक यज्ञ समान मानले जाते . पोटातील अग्नी शांत करणे , ज्यासाठी सुरुवातीला वरण भात तूप याने जेवणाची सुरुवात केली जाते .शक्यतोवर षडरस म्हणजे खारट, आंबट , तुरट , गोड , तिखट आणि  कडू याचा समावेश जेवणात केला जातो .

जेव्हा पंगत जेवायला बसते किंवा संयुक्त कुटुंबात सगळे जेवायला बसतात , सणावारी कुटुंबीय एकत्र जेवायला बसतात तेव्हा सुरुवातीला श्लोक म्हटला जातो ज्याचा अर्थ आहे की अन्न हे पूर्णब्रह्म आणि यज्ञकर्म असे म्हंटले आहे . हा श्लोक म्हणून सर्वांनी जेवायला सुरुवात करायची , जे एक संयम शिकवते आणि जेवण म्हणजे काय याची आठवण केली जाते . तो श्लोक असा आहे ....

वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे |

सहज हवन होते नाम घेता फुकाचे |

जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म |

उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ||१||

जनी.....||२||

जय जय रघुवीर समर्थ ||

जेवण झाल्यावर शतपावली , वामकुक्षी हा अजूनही बऱ्याच जणांचा नियम असावा , जास्त करून जुनी लोकं आणि खेडेगावात राहणारी . शास्त्र आणि शिस्तीचे अनेक फायदे असतात आपल्या जीवनात फक्त ते माहीत असणं आणि ते आत्मसात करून त्याचा नियमाने अवलंब करणे गरजेचे आहे.

याबरोबरच उपवास करणे याचही महत्व आहे ,फक्त आध्यात्मिक दृष्ट्या नाही तर शरीर स्वास्थ्य ह्या दृष्टीनेही त्यातही विज्ञान आहे . एकादशी , चतुर्थी , पौर्णिमा , आपल्या कुलदेवतेचा वार आणखीनही अनेक व्रत - उपवास नेमाने करणारी बरीच जणे असतात . उपवासाने पोटाला, आतड्यांना आराम मिळतो आणि ते स्वच्छ होतात . 

तसेच संध्याकाळच्या वेळी लहान मुलांनी देवासमोर बसून श्लोक आणि स्तोत्र म्हणायचे ., घरातील वडीलधारी माणसे शिकवतिल तसं. त्यामुळे देवाचं नाव घेणं हे तर आहेच पण उच्चार व स्मरणशक्ती चांगली होते. रोहन आणि यश सुद्धा बऱ्याचदा यशच्या आजीसोबत बसून श्लोक शिकत असत .

असे अनेक प्राचीन शास्त्र आणि नियम याबद्दल आपण जाणून घेऊया आणि त्याचा आपल्या जीवनात समावेश करून घेऊया ज्याचा आपल्याला व पुढील पिढीला सुध्दा फायदा होईल . शास्त्र हे बाऊ करण्याचा किंवा किचकट आणि जुनाट विचार किंवा विषय नाहीये तर त्यामुळे आपले शारीरिक , मानसिक स्वास्थ्य चांगले राहू शकते ह्याचा आपण नक्कीच विचार केला पाहिजे . 



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract