STORYMIRROR

शुभांगी कोतवाल

Children Stories Inspirational

3  

शुभांगी कोतवाल

Children Stories Inspirational

ध्रुव बाळ ते ध्रुव तारा

ध्रुव बाळ ते ध्रुव तारा

3 mins
170

आज 'संगीत खुर्ची ' हा खेळ खेळलो , खूप मजा आली . संगीत सुरू झालं की उलट - सुलट मांडलेल्या खुरच्यान भोवती सर्वांनी फिरायला सुरुवात केली , संगीत संपलं की ज्याच्या समोर खुर्ची आली ते बसून जात खुर्चीवर आणि जे उरले ते खेळातून बाहेर . प्रत्येक वेळेला एक खुर्ची पण कमी होत असे . असं करत करत शेवटी जे राहिलेल्या एकाच खुर्चीवर बसले ते खेळ जिंकले .

हा तर झाला खेळाचा भाग , पण खुर्ची , स्थान , जागा हे जीवनातही किती महत्त्वाचं असतं आणि ते मिळवण्यासाठी प्रत्येकाची धडपड , परिश्रम चालू असते . ऑफिस मधलं स्थान म्हणजे हुद्दा आणि त्याप्रमाणे मिळणारं स्थान , खुर्ची , केबिन , महत्त्व हे सगळं त्याबरोबर येतं. 

फक्त ऑफिसच नाही तर कुठलीही संस्था असो , शाळा - कॉलेज इतकंच काय तर राजकारणात तर म्हंटल जातं की खुर्ची साठी सगळे आसुसलेले असतात आणि एकदा ती मिळाली तर ती खुर्ची सोडायचं कोणी नाव घेत नाही कारण ती खुर्ची त्यांना सत्ता मिळवून देते आणि सत्ता ही महत्वाची .

कुटुंबातील स्थान सुध्दा महत्वाचं असतं पण ते वय , नातं ह्या आणि अशा बऱ्याच गोष्टी वर अवलंबून असते आणि ते ठरल्याप्रमाणे असतं , तिथे कोणाला आपल्या स्थानासाठी चढाओढ करावी लागत नाही .

बाल्यावस्थेत आपण खुर्ची किंवा सोफा किंवा उंच जागी स्वतः बसू शकत नाही तर आई आणि मुख्यतः वडिलांच्या मांडीवर बसणं हा जणू आपला हक्क ही असतो आणि त्यात एक गम्मत ही असते . ह्यावर आधारीत पुराणातील कथा आहे जी खूप विलक्षण आहे .

ध्रुव बाळ

उत्तानपाद राजा आणि राणी सुनिती ह्यांचा पुत्र म्हणजेच ध्रुव . त्याची एक सावत्र आई सुद्धा होती सुरुची , तिलाही एक पुत्र होता आणि ती राजाची आवडती राणी होती . 

एकदा ध्रुव बाळ सकाळी खेळत - खेळत आपल्या वडिलांच्या म्हणजे राजा उत्तानपाद ह्याच्या मांडीवर जाऊन बसतो . तिथे नेमकी त्याची सावत्र आई आपल्या मुलाला घेवुन येते आणि जेव्हा ध्रुव राजाच्या मांडीवर बसलाय हे पाहून तिचा राग अनावर होतो ती ध्रुव बाळाला धक्का देवून तिथे आपल्या मुलाला बसवते . राजा सुद्धा काही बोलू शकत नाही आवडत्या राणी समोर . ध्रुव बाळ खूप दुखावला जातो त्याला काही समजत नाही काय करावे ? 

ध्रुव बाळ आपल्या आई कडे म्हणजे राणी सूनिती कडे जाऊन आपली व्यथा सांगतो . आणि अर्थातच त्याला प्रश्न पडतो की असं का ? तेव्हा त्याची आई त्याला सांगते की तू देवाजवळ असं स्थान माग की जिथून तुला कोणीही उठ असं म्हणणार नाही , किंवा धक्का मारणार नाही , तर त्यासाठी तू भगवान विष्णु यांची उपासना कर ते नक्की तुला मदत करतील .

ध्रुव तारा 

एके दिवशी ध्रुव आपल्या आईचा आशिर्वाद घेवून एका मधुवन नावाच्या घोर अरण्यात निघून जातो . तिथे बसून तपश्चर्या करतो . ऊन पाऊस दिवस रात्र सगळं विसरून तो विष्णु नारायणाचा जप करतो .

ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः !

तेव्हा विष्णू त्याला "तथास्तु" असं म्हणून " त्याची ईच्छा पुर्ण होईल , असं म्हणतात पण त्याआधी तू आपल्या आईवडिलांकडे म्हणजे आपल्या राज्यात परत जायला सांगतात . " तिथे राजा आणि राणी सुनिती त्याची वाट बघत असतात त्याचा राज्याभिषेक करून त्याचे लग्न लावून देतात. 

आणि विष्णूने दिलेल्या वरदाना प्रमाणे मोक्षपद मिळालं. म्हणजे आकाशात त्याला उत्तरेकडे अटल असं ध्रुव तारा म्हणून स्थान प्राप्त होतं. ज्याची जागा नेहमी स्थिर असते . अगदी उत्तर दिशेला नेहमी हा ध्रुव तारा पाहायला मिळतो . 

इतर तारे उगवतात आणि मावळतात पण ध्रुवतारा कधीच आपल्या जागेवरून हालत नाही . ध्रुव बाळाचा झालेल्या अपमानामुळे त्याला एक महत्वाचं स्थान मिळवण्यासाठी प्रेरित केले , आणि तो ध्रुव तारा म्हणून ओळखला जातो. 


Rate this content
Log in