(A world without technology) तंत्रज्ञान विरहित जग
(A world without technology) तंत्रज्ञान विरहित जग
आम्ही मित्र - मैत्रिणींनी आज ठरवलं आपण ह्या उन्हाळ्याच्या सुट्टीत एखाद्या नैसर्गिक ठिकाणी सहल करायची म्हणून. अशा ठिकाणी जिथे कोणत्याही प्रकारच्या आधुनिक सुखसोयी नसतील आणि नैसर्गिक हवेशीर वातावरण असेल अशा ठिकाणी जाऊन आम्ही राहायचं ठरवलं आणि तेवढ्यात सरिता म्हणाली की हो असं एक ठिकाण आहे ,माझ्या माहितीतल्या म्हणजे माझ्याच मामाचं एक मोठं घर आहे गावामध्ये जे सध्या रिकामं असतं आणि तिथे आपण राहायला जाऊ शकतो तर आम्ही सगळ्यांनी होकार दिला आणि ठरलं की आपण या उन्हाळ्याच्या सुट्टीत तिथे सगळे राहायला जायचं आणि एक स्वतःचीच परीक्षा घ्यायची की कोणत्याही प्रकारची आधुनिक उपकरणं न वापरता आपण किती दिवस तिथे राहू शकतो याची आपल्याला स्वतःची परीक्षा घेता येईल आणि तसा आमचा प्रवास सुरू झाला .
आम्ही तिथे पोहोचलो आणि घर वगैरे उघडून तिथे येऊन विहिरीचं पाणी काढलं आणि प्रत्येकाने आपलं सामान वगैरे नीट लावून तिथे पंखा पण वापरायचा नाही आणि लाईट पण वापरायचा नाही गॅसचा पण वापर न वापरता चुलीचा वापर करायचा स्वयंपाक करण्यासाठी असं सगळं ठरलं . आप-आपले मोबाईल फोन बंद करून ठेवले फ्रिज पण वापरायची गरज नव्हती आणि शुद्ध पाणी असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या फिल्टरची गरज नव्हती . आंघोळीसाठी सुद्धा गरम पाणी न वापरता नदीवर स्नान करायला जायचं असं ठरलं असं बरच काही प्रयत्न करून कुठल्याही प्रकारचा आधुनिक उपकरण वापरण्याची अट होती ती पूर्ण करायचं ठरवलं .
तसं त्या दिवशी आम्हाला काही स्वयंपाक करण्याची गरज भासली नाही कारण प्रत्येकाने आपापल्या सामानात खायच्या वस्तू वगैरे घेतलेल्या होत्या त्याच आम्ही जेवलो आणि इलेक्ट्रिक पंख्याचा वापर न करता झोप कशी येणार ह्यासाठी आम्ही ओसरीतच खाटा टाकून अंथरून टाकून झोपायचं ठरवलं आणि खरंच इतकी शांत आणि सुखाची झोप लागली की पंख्याची काही उणीव भासली नाही. पहाटे सुद्धा कुठल्याही प्रकारच्या अलार्म ची गरज पडली नाही. कारण पक्ष्यांचा किलबिलाट आणि शेजारी पाजारी लोकांची उठण्याची वेळ , गाईचं हंबरणं हे सगळं सुरू झालं होतं तसंच ओसरीत सूर्यप्रकाश सुद्धा पडल्यामुळे सकाळ झाल्याची आम्हाला जाणीव झाली.
आता आज मात्र सकाळी आपापले नित्यक्रम आटपून चूल पेटवून आणि आज काहीतरी न्याहारीसाठी करावं लागणार आणि ते सुद्धा चुलीवर त्यासाठी चूल पाहिली बाहेर ओसरीतच चुली आणि लाकडं फोडून पडलेले होते त्या आम्ही पेटवून आणि मस्तपैकी चहा करून प्यायलो आणि न्याहारीसाठी सुद्धा तशी तयारी होती घरातही काही वस्तू होत्या त्यामुळे आणि त्यांच्या शेतातली ताजी भाजी आम्हाला आणून दिली होती शेतकऱ्यांनी त्यामुळे आमची खूप सोय झाली.
आता मात्र सगळ्यांना आपापल्या मोबाईल फोनची आठवण यायला लागली अगदी सकाळ झाली की स्वतःचे मेसेज ईमेल चेक करण्याची सवय पडलेली असते ती कशी सुटणार? कोणाशी काही संपर्क नाही. कपडे पण आपापले सगळ्यांनी धुवावे लागले कारण वॉशिंग मशीन चा उपयोग पण करायचा नव्हता. न्याहारी केल्यावर आम्ही तिथे जवळच एका मंदिरात देवाचे दर्शन करून पुढे शेत पाहायला जाऊ म्हणून निघालो आणि तिथेच त्यांचे फळझाडं पण होते तिथून पेरू कच्च्या कैऱ्या बोरं असं आम्ही तोडून आणलं आणि तिचे थोडेसे फळ खाऊन आम्ही परत घरी परतलो.
दुपारचा स्वयंपाक चुलीवर करायचा होता त्यामुळे प्रत्येकाने आपापले काम वाटून घेतले कोणी भाजी चिरली, कोणी कणिक भिजवली, कोणी भात केला असं छान पैकी ताजी भाजी आणि चविष्ट जेवण आम्ही जेवलो. आता मात्र गरम व्हायला लागलं होतं पण पंख्याचा वापर न करता आम्हाला दुपार काढायची होती तर आम्ही समोर खूप मोठं एक झाड होतं कडुलिंबाचं तिथे बसलो खूप छान थंडगार हवा येत होती तिथेच काही जण आडवे पडलो आणि हळूहळू उन ओसरत गेलं तसे आम्ही घरात येऊन परत संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी केली कारण गावात लवकर जेवून लवकर झोपायची सगळ्यांना सवय असते आणि लाईटचा सुद्धा वापर करायचा नव्हता त्यामुळे आम्हाला खूप लवकर स्वयंपाक करणे भाग होता तर अंधार पडायच्या आधी आम्ही स्वयंपाक करून जेवून घेतलं आणि नंतर गप्पा गोष्टी भेंड्या हे सगळं करण्यात केव्हा रात्र झाली आणि झोप आली हे कळलं सुद्धा नाही.
संध्याला मात्र आता फोनची खूप आठवण झाली कारण तिला तिच्या लहान मुलाची चौकशी करायची होती . तिच्या आईजवळ ति स्वतःच्या मुलाला सोडून आली होती त्यामुळे तिला आठवण येत होती पण बघू तिचं किती पर्यंत फोन न वापरण्याचं संकल्प पाळला जातोय.
असं करत करत जवळजवळ पाच-सहा दिवस निघाले तर स्वयंपाक करताना आम्हाला काही मसाला वगैरे पण करायचा असला काही वाटण करायचं असलं तर मिक्सर चा वापर न करता तिथे पाटा वरवंटा वापरत होतो. अशाप्रकारे आम्ही आमचे नियम पाळले. पण आता खरंच लक्षात येत होतं की मनुष्याने हे स्वतःच्या सोयीसाठी जे काही नवीन नवीन शोध लावले आणि आज ज्याचा आपण अगदी सहजपणे वापर करतो जसं की मिक्सर, गॅस, गिझर, लॅपटॉप, मोबाईल फोन, इस्त्री करण्यासाठी आणि अशा बऱ्याच वस्तू ज्या आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण सहजपणे वापरतो आणि त्याची उणीव आपल्याला इतकी भासू शकते याची कधी कल्पनाच केली नव्हती.
तिथे कुठे शहरात जायचं म्हटलं तर आम्ही ठरवलं होतं की गाडी वगैरे चा वापर करायचा नाही तर पायी पायी दूरपर्यंत जाणं शक्य नव्हतं पण तरी आम्ही जवळपासच्या लहान शहरासारख्या ठिकाणी जाऊन काही खरेदी, घरात लागणारे जिन्नस वगैरे विकत घेऊन आलो त्यामुळे बऱ्याच प्रकारे आम्हाला मदत झाली.
तसं म्हटलं तर ते अशक्य नाहीये पण खूप सोपं पण नाहीये की कोणत्याही आधुनिक सुख सोयींचा वापर न करता पुढचं जीवन आपण जगू शकतो पण जसं ऑफिसचं काम किंवा एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी राहणाऱ्यांशी संपर्क साधणं, त्यांची खुशाली विचारणं, सोशल मीडियावर मित्र-मैत्रिणींशी संपर्क, मोबाईलचा वापर नसल्यामुळे आम्ही किती सुंदर अशा ठिकाणचे फोटो पण घेऊ शकत नव्हतो ते पण एक मनाला लागून राहिलं होतं .
आपण शहरातल्या लोकांना इतक्या लवकर झोपून जाणं टेलिव्हिजन न बघता आणि जगात काय चाललंय याची काही जाणीव नसणं हे सगळं कठीण होतं पण काही गोष्टी वर्तमानपत्रातून आम्हाला वाचून कळत होत्या त्यामुळे इतकं ते अवघड गेलं नाही .
पण खरच नवीन पिढीसाठी अशा प्रकारचं कोणत्याही प्रकारचे उपकरण न वापरता जगणं हे खरच खूप कठीण काम आहे कारण त्यामुळे आपल्याला पुष्कळ सोयी पण होतात आणि त्या वस्तूंची आपल्याला इतकी सवय लागून गेलेली असते की त्याशिवाय आपल्याला बरेचशे काम अडून राहतात. साधा पैशाचा हिशोब करणे यासाठी पण आपण पटकन मोबाईल मधला कॅल्क्युलेटर चा वापर करतो अशा बऱ्याच लहान लहान गोष्टी असतात ज्याची आपल्याला जाणीवही नसते की आपण इतक्या उपकरणांचा उपयोग करतो ज्याचा शोध कितीतरी वर्षापासून लागलेला आहे.
चुली समोर बसून जेवण बनवणे सुद्धा इतका सोपं नाहीये, धुराची आपल्याला सवय नसते आणि कमी जास्त उष्णता हवी असते काही वेळेला त्याप्रमाणे चुलीमधले लाकुड बाजूला करून ठेवणं किंवा त्यात परत उष्णता वाढवणं हे सगळं तितकं सोपं नसतं. आपल्याला मिक्सरवर पटकन एखादी चटणी किंवा मसाला वाटून घेण्याची सवय लागलेली असते ती सुद्धा पाट्या - वरवंट्याने करण्याचे सवय नसते.
अमुक मालिका किंवा प्रोग्रॅम बघितल्याशिवाय आपल्याला आवडत नाही वेळ जात नाही पण टेलिव्हिजन सुद्धा बघायचं नाही अशी आमची अट होती. मोबाईल तर नेहमीच आपल्याला जवळ लागतो आणि तो न वापरता राहणं हे सुद्धा खूप मुश्किल होतं पण अशक्य ही नव्हतं कारण जर आपण एकमेकांशी संवाद साधत असलो आणि मित्र-मैत्रिणीबरोबर बसलो तर आपल्याला मोबाईलची सुद्धा इतकी गरज भासत नाही.
संध्याला आम्ही थोडं तिच्या मुलाची चौकशी करण्यासाठी आणि त्याच्याशी बोलण्यासाठी दोन-तीन दिवसांनी ती मोबाईल फोन वापरू शकेल अशी तिला सोय दिली त्यामुळे ती पण खूष झाली. असा आमचा हा प्रवास जवळजवळ पंधरा दिवस झाले सुरू होता पण आम्ही असं अनुमान केलं की खेडेगावात किंवा गावांमध्ये ते इतकं अशक्य नाही पण शहरासारख्या ठिकाणी खूपच कठीण असू शकतं कारण नैसर्गिकरित्या मिळणारा वारा किंवा थंड हवा हे सगळं शहरांमध्ये नसतं.
अर्थात दैनंदिन जीवनामध्ये जरी खेडेगावात हे शक्य असले तरीही शेती आणि इतर बऱ्याच कारणांसाठी नवीन उपकरण आणि तंत्रज्ञान याचा वापर केला जातो जसे शेतीमध्ये ट्रॅक्टर आणि इतर सामग्री गावात एखादा टेलिफोन बूथ, म्हणजे इथून बाहेरगावी कोणाला फोन करून बोलायचं असेल त्याची सोय असू शकते असे आणि आता प्रत्येक जणांकडे मोबाईल फोन पण असतात खेडेगावात त्यामुळे आता तिथलं जीवनही बरचसं तंत्रज्ञानावर अवलंबून आहे पण तरीही दैनंदिन जीवन हे तंत्रज्ञानाशिवाय जगणं अशक्य नाहीये.
आणि अशाप्रकारे आम्ही कुठल्याही आधुनिक उपकरणांचा किंवा तंत्रज्ञानाचा वापर न करता आमचा 20-25 दिवसांचा प्रवास संपवला आणि एक खूप मोठं काहीतरी आपण साध्य केलं असं आम्हाला वाटायला लागलं अर्थात त्याचबरोबर हेही लक्षात आलं की आपले जे पूर्वज, आजी - आजोबा जे गावांमध्ये राहून ज्यांनी पूर्ण आयुष्य घालवलं त्यांची खरच कमाल होती आणि त्यांनी खरं नैसर्गिकरित्या आणि नैसर्गिक वातावरणात जीवन जगलं आहे जे आपल्याला आज शक्य नाही याची खंत आहे कारण तंत्रज्ञानाचे जितके फायदे आहेत इतकेच काही वेळेला तोटे किंवा उणीव असू शकतात.
आणि ह्याच बरोबर आपण या सर्व उपकरणांचा शोध लावणारे वैज्ञानिक आणि शोधक ह्यांचे आपण मनापासून आभार मानायला हवे कारण त्यांच्या प्रयत्नांमुळे आणि कष्टांमुळे आज आपल्याला इतकं सरळ आणि सहज जीवन जगायला मिळतंय आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट असते की वेळ वाचतो आणि सोय आणि सुखकर जीवन होतं त्यासाठी त्यांचे पण आपण धन्यवाद मानायला पाहिजे.
या दोन्ही गोष्टी आम्ही लक्षात घेऊन आणि आम्हाला त्याचा पूर्णपणे अनुभव आला आणि या प्रकारे आम्ही आमचा शहराकडे परतीचा प्रवास परत सुरू केला आणि परत आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्ही व्यस्त होऊन गेलो.
