घर माझे
घर माझे
प्रेम ,आपुलकी
त्याग आणि सेवा
घरामध्ये माझ्या
मायेचा ओलावा.
घर माझे छोटेखानी
नाही जरी टुमदार
अतिथिच्या स्वागताला
नेहमी उघडे दार.
घर माझे कुडाचेच
अंगणात सारवण
फुलझाडांसवे शोभे
तुळशीचे वृंदावन.
एकटेपणाची ढाळून आसवे
मूकपणे ढसाढसा रडतंय.
गेलीस का तू अचानक म्हणून
घर आपलं माझ्याशी भांडतंय.
घर माझे गोकुळासारखे
नांदती इथे पिढ्या तीन.
एकमेका घेती समजून
नात्यांची अशी घट्ट विण.