शिक्षक
शिक्षक
पुस्तक विद्यार्थांमधील
दुवा असतो शिक्षक
आरसा असतो जगाचा
समाज बांधिलकीचा रक्षक
जन्मदात्या आईबापाला
न जुमानणाऱ्या मुलांना
वठणीवर असतो आणत
शिक्षक रूजवतो संस्कारांना
विद्यार्थांच्या कलागुणांना
देत असतो प्रेरणा प्रोत्साहन
बेशिस्त धुंद विद्यार्थ्यांना
शिस्त लावून करतो सहन
सतत माध्यमांचा बनतो विषय
सरकारचा आवडता कर्मचारी
सर्व सरकारी योजना राबवतो
समाजातील हा घटक विचारी
गुरू चे स्थान आदर्श जगी
घडवितो वैद्य आणि वैज्ञानिक
समाजाशी राहतो सदा प्रामाणिक
वकील, शेतकरी आदर्श व सैनिक
व्यापारी वर्ग असो वा राजकीय
शिक्षक असतो सल्लागार साऱ्यांचा
शिक्षक आहे कणा समाजाचा
वसा ज्याने घेतला देशसेवेचा
