STORYMIRROR

somadatta kulkarni

Inspirational

3  

somadatta kulkarni

Inspirational

नवरात्र

नवरात्र

1 min
183

वाजत आला

सण वर्षाचा

माझ्या अंबेचा

नवरात्रीचा    १


गरबा खेळू

आनंदे न्हाऊ

तव भजनी

तुझाच होऊ   २


देवी समोर

गायन करु

तिच्या रूपाचे

वर्णन करू    ३


नऊ दिवस

स्तवन करु

जगदंबेचे

चरण धरू     ४ं


कात्यायनीचे

स्वरुप पाहु

भक्ती रसात

लीन होऊ     ५


शिवाची शक्ती

चंद्र घंटा तु

कार्तिकेयाची

स्कंद माता तू    ६


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational