ती त्याच्या जवळच होती
ती त्याच्या जवळच होती
ती त्याच्या जवळच होती...
त्यांच्यातली अंतराची वलयं
काहीच बोलत नव्हती
शिल्लक राहिलेलं अंतर
पार करायची... कदाचित्
नियतीची मर्जी नव्हती
न बोलणारी शांतता मात्र
कुजबुजताना लहरत होती
ती निःशब्द पाहत होती
तो अव्यक्त होत होता
रितेपणाची सारी वादळं
श्वासापर्यंत पोहोचली होती
दिलास्याची हाक होती
आधाराची साथ होती
तरी उसासे शहारलेले
अनोळख्यापरी नजरेत होती
ती त्याच्याजवळ होती
जशी श्रावणाची सुरूवात होती
त्याची निघायची वेळ होती
जणू रात्र आषाढाची सरली होती
न बरसणाऱ्या शब्दफुलांची
बरसात त्यांना भिजवणार होती...