शिल्पकार
शिल्पकार
जीवनाच्या भवसागरात जसा दीपस्तंभ,
तुमच्या हस्ते शिक्षणाचा श्रीगणेशा आरंभ
-हस्व दीर्घच्या दांड्या घेऊन पळणारे आकडे,
पाठांतराशी तर आमचे कायमचे वाकडे
वांड मुलांमधूनही घडविलेत तेजस्वी हिरे,
शाळेमधे सतत तुमची घारीची नजर फिरे
दंगा करण्यास ठरलेला शेवटचा बाक,
तरी होता कुठेतरी मनात तुमचा धाक
अवघड भूमिती-बीजगणित तुमच्या हातचा मळ,
आमच्या घडण्यामधे तुमचीच खरी तळमळ
रूजविलेत समाजात ज्ञानाचे बीज खोल,
अगणित धनानेही ना होणे तुमचे मोल!
