STORYMIRROR

Prashant Shinde

Romance

3  

Prashant Shinde

Romance

पहिलं प्रेम..!

पहिलं प्रेम..!

1 min
3.7K


बाल सभा नेहमी

आठवड्यात पार पडायची

हुशार मुलं पुढं पुढं करून

खूप बडबडायची


विषय वेगळे वेगळे

प्रत्येकाचे रंग आगळे वेगळे

भाषण पण रंगायची

मुलं आपोआप दंगायची


टाळ्या पडायच्या

शिट्ट्या वाजायच्या

भाषण पाडायच्या

पैजाही लागायच्या


अशाच एका बालसभेत

माझे भाषण रंगात आले

सर्वांचे डोळे पाणावले

सर्वांनी खुप कौतुक केले


शेवट भाषणाचा

खूप मिश्किल कोटीचा होता

तो त्या वयात सर्वांच्या

डोक्यावरून गेला होता


तेवढ्यात माझी नजर

मागच्या कोपऱ्यात गेली

चिमुरडी गोरी गोमटी

नजर देऊन माझ्या काळजात घुसली


ती अशी घुसली जी

परत बाहेर आलीच नाही

अजूनही ती आतच आहे

बाहेर कधी ती येतच नाही....!



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance