वीरांगना
वीरांगना
होत्या अगणित धनाच्या राशी ..
तरीही तिला प्रिय होती फक्त झाशी ...
वीरांगना विजयश्री ती
वाघा वाणी लढली जशी...
पळता भुई थोडी केली...
फिरांग्यांच्या लागून पाठी...
मे मेरी झाशी नाही दूंगी...
हे एकच ब्रीद ओठी...
साहसी ती स्वाभिमानी..
कधी ना हरली...
आजन्म लढली ...
कधी ना रडली...
तात्यांची ती शुर शिष्या ...
मनु ची झाली लक्ष्मीबाई...
फिरांग्याना हकालण्यात...
मोठी तिची लगीनघाई...
लहान मोठ्या चा करी सन्मान ...
केली देशाची उंच मान...
शौर्य गाजवले रणांगणा...
वीर राणी... महाराणी.... वीरांगना..
