STORYMIRROR

Kanchan Thorat

Abstract Romance

4  

Kanchan Thorat

Abstract Romance

ओंजळीतली प्रीतीफुले,

ओंजळीतली प्रीतीफुले,

1 min
178

जे कधीच नव्हते, तुझे सखे,

त्यामागे धावलीस तू!

आहे जे तुझ्याकडे,

ते कशी विसरलीस तू !


नसतं जिचं कोणीही कधी,

 तिचं कपाळ आठवून बघ.

 वाटनीला आलो तुझ्या मी,

 तू थोडं साठवून बघ!


रिते असते माझे जीवन,

 न मानता तुला सोबतिन,

 भरले असेल उरात काही,

 तू थोडी कोसळून बघ!


अहम‌्‌तेचा तुझा दिवा,

 तू थोडा मालवून बघ,

 लख्ख प्रकाश विश्वासाचा

तू, थोडी न्हाऊन बघ!


चिंब भिजलेल्या अंगाने,

 तू थोडी शालिन हो,

प्रेम वर्षावात, माझ्या

 पुन्हा पुन्हा ओली तू हो!


जाऊदेत जळमटे मनीची,

 सांज, काळ्या आठवणींची,

 वेड्या, तुझ्या हट्टापायी,

 विरजण सुखा, लावू नकोस


नसतं जिचं कधीच कोणी,

 तिचं कपाळ आठवून बघ,

 आहे जे तुझ्याकडे,

 ते तू, राणी, साठवून बघ!


जे कधीच नव्हते, तुझे सखे,

 त्याचा विचार, सोडून बघ! 

 ओंजळीतली प्रीतीफुले,

तू, थोडी माळून बघ!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract