STORYMIRROR

Varsha Shidore

Abstract

4  

Varsha Shidore

Abstract

शब्दांचे दडपण...

शब्दांचे दडपण...

1 min
349

बेफिकीर ती एक वेळ 

डोक्यात क्षणाची भेळ 

शब्द बेधुंद माझ्या मनात......


विचार काहीसा काहुर 

जीवाला लागली हूरहूर 

वेडी धगधग चाले श्वासात.....


प्रश्नांचं कोडं हे विचित्र 

उत्तरांचं रिकामं हे चित्र 

अश्रूंची धार माझ्या डोळ्यात.....

 

चंद्र रात्री धाकधूक 

झोप उडवणारा राक्षस 

ध्येयवेडे स्वप्न माझ्यात.....


शब्दांचे दडपण भित्रं

भेटतील का ते शब्द मित्र 

किती आहे चित्र विक्षिप्त....


एक रात्र अशीही आली 

झोप उडवून काहीशी गेली 

एक स्वप्न लपवून गेली माझ्यात.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract