होरपळ
होरपळ
शब्द नि:शब्द झाले मेंदू बधिर झाला
मनही सुन्न झाले भावनाही ओशाळल्या
जे कधीच घडू नये
त्या घटना रोजच घडू लागल्या
तू देवी तू माता तू भगिनी
तू जगाला उद्धारी
या फक्त बोलण्याच्या गोष्टी झाल्या
रोज करण्या अत्याचार
वाईट प्रवृत्ती सरावल्या
परंपरा, वारसा, अस्मिता, पुण्यभूमि
असल्याच्या गर्जना होत राहिल्या
समाजातील लाडक्या लेकी मात्र
रोज आगीत होरपळू लागल्या
बेटी बचाओ, बेटी पढाओ
फक्त घोषणा ऐकू येऊ लागल्या
विद्यादान विद्यार्जनाचे कार्य व्हावे तिथे
निष्पाप कळ्या खुडल्या जाऊ लागल्या
दुष्टदुर्जनांनो तुमची आता गय नाही
काळ आता तुमचा जवळ आला
निर्दालन करण्या अन्याय अत्याचाराचे
दुर्गा रणरागिणी सरसावल्या...
