मायची पुण्याई
मायची पुण्याई
1 min
190
माझ्या मायची काय सांगु पुण्याई
ऋणातुन तुझ्या मी कसा होऊ उतराई (धृ)
किती जरी मी मोठा झालो
तुझ्यासाठी मी तान्हेबाळ
येऊ दे कशीही परिस्थिती
नाही तुटणार आपली नाळ
नऊ महिने पोटात तुझ्या मला गादीन् रजई
माझ्या मायची काय सांगु पुण्याई (धृ)
तुच माझा भाव तुच माझा देव
जरी असेन मी किती मोठा
तुच माझे आभाळ
माझ पहिल संगीत तु गायलेली अंगाई
माझ्या मायची काय सांगु पुण्याई(धृ)
तुच माझी दुनिया तुच माझा गाव
तुच माझे जग तुच माझी सोय
मिळतील किती सुखे पण त्याला
तुझ्या कुशीच्या उबेची सर येणार नाही
माझ्या मायची काय सांगु पुण्याई(धृ)
रात्रंदिन माझ्यात तुझ्या प्रेमाची साठवण
मी असेल दुःखात कि सुखात
नाही येणार आठवण असे होणारच नाही
माझ्या मायची काय सांगु पुण्याई
तुझ्या ऋणातुन मी कसा होऊ उतराई.
