STORYMIRROR

Makrand Jadhav

Others

4  

Makrand Jadhav

Others

प्रेम म्हणजे प्रेम असतं

प्रेम म्हणजे प्रेम असतं

1 min
843

प्रेम म्हणजे प्रेम असतं

तुमचं आमचं अजिबात सेम नसतं ।।धृ।।


कुणी झुरत असतं, कुणी मरत असतं

कुणी हसत असतं, कुणी रडत असतं ।।धृ।।


कुणी फुल वेचतं, कुणी काट्यावर निजतं

कुणाचं वाढत असतं, कुणी मात्र कुढत असतं ।।धृ।।


कुणी दबकत असतं, कुणी दचकत असतं

कुणी व्यक्त होतं, कुणी अव्यक्त राहतं ।।धृ।।



कुणी दाखवत असतं, कुणी लपवत असतं

कुणाच्या हृदयात असत, कुणाच्या मनात असतं ।।धृ।।


कुणाच तारेवरची कसरत असतं, कुणी फक्त झिजत असतं

कुणाच अपूर्ण राहतं, कुणाच पूर्ण होतं ।।धृ।।


Rate this content
Log in