STORYMIRROR

Gangadhar joshi

Abstract

4  

Gangadhar joshi

Abstract

रात्र

रात्र

1 min
334

रात्रीच्या शब्दाला

अंधाराचे कान

शब्दाच्या मायेला 

सावलीचे भान


मायेच्या झाडाला

राघूचे ठाण

झाडाच्या बाजुला

आंब्याचे रान


रातोरात रानात

गातात गाणी

फिरतात पावले

जरा अनवाणी


पावलात त्याच्या

घुंगराची चाळ

सुगंधी फुलांची

गुंफूनी माळ


माळेत गुंतला

राजहंस पक्षी

नक्षत्राच्या आकाशी

चंद्रकोर साक्षी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract