STORYMIRROR

Vijay Deshmukh

Abstract

4  

Vijay Deshmukh

Abstract

हरवलं मन

हरवलं मन

1 min
738

माह्या मनाचं भ्रमण

कुण्या गावात रमलं,

कुठं हाय ठाव तेचा

मले कोण रं सांगल||१||


आता हितंच रं हुतं

आता कुठबी गावंना,

गेलं फिरत फिरत

तेचा पता बी लागणा||२||


तेला धुंडे चहूकडं

जीवा माह्या घालमेलं,

उंच डोंगरी धुंडलं

नाही झालं आलबेल||३||


कुठं असंल कळंना

कुणी धाडाल टपाल,

सुन्या जीवाचं रं तेनं

केलं जगणं बेहाल||४||


बापड्यानु तुमी जरा

मले मदत कराल,

माह्या मनाची जरा

तुमी समज घालाल||५||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract