STORYMIRROR

Vijay Deshmukh

Others

3  

Vijay Deshmukh

Others

आर्त हाक

आर्त हाक

1 min
235

अरे अरे पावसा 

कुठे झाला तू दिसेनासा

तुजविन बळीराजाच अडलंय

कोण जाने तुला कोण रे नडलंय


आस तुझी तो धरून बसला

तुझ्या येन्याआधिच धरणीची कुस भरुन बसला

तुझ्या येन्यान धरणीची कूस बहरंल

अन् कुठेतरी याच्या मुखावर हसु मोहरंल


वाट तुझी बघन्यात झिजतेय काया

का रं लेकरावरचि परकी केलि तू माया

बघ एकदा येवून हाल या लेकराचे

जगणं होऊन बसलं आहे जिकिरीचे


तुझ्या या लेकरांना

तुझविन कोण आहे

एकवार जवळ ये

दुरुनिच का तू पाहे?


तुझ्या येण्याने कदाचित

पिंकी जाईल सासरी

अथरुणाबाहेर पडतील कदाचित

म्हातारा अन् म्हातारि


जगणं तुझविन असह्य होत आहे

दुरुनच झाडाचा फास आता खुनावतो आहे

माफ कर मला, लाज तुला वाटू दे

तुझ्या हृदयाला आता तरी पाझर फुटू दे.


Rate this content
Log in