STORYMIRROR

Vijay Deshmukh

Tragedy Others

4  

Vijay Deshmukh

Tragedy Others

ईदन्यान

ईदन्यान

1 min
165

दादूस नं मह्या गाठली साळा

पोट्रयामन्दि आणुनिया गोळा

बापुस महा मनं साइकिलिवर गेला

अन् मह्या दिमतिला मातरं मोटरीचा मेळा.

मनं हे सारं इदन्यानानं झाला.


दादूसनं मह्या संभरी गाठली

बापुसची ताकद पन्नाशीत आटली

महं तर इचारुच नगा

मनं हे बी सारं इदन्यानानं झाला.


दादूसला मह्या आबाळाचं छप्पर

अन् जमिनीचं बिस्तर

बापूसच्या लहानग्यापनि कुडाचि झोपड़ी

अन् मला मातुर दोन मजली माड़ी

मनं हे सारं इदन्यानानं झाला.


दादूसच्या छपराखाली मनं दोस्तानचा मेळा

बापूसच्या झोपडीतही मनं हुता उलीसा जिव्हाळा

मह्या माडीचा मातूर इचारु नगा

मनं हे बी सारं इदन्यानानं झाला.


दादूसची मह्या कथाच भारी

नागड्या अंगावर सुताची सरी

बापुस महा गडी खादिचा तालेवार

अन् मला मातूर कापडं हजार

मनं हे सारं इदन्यानानं झाला.


दादूसच्या सरीत हुती ताकद लई

गनागोताच्या ओलाव्यात नव्हती सुई

बापूसच्या खादिचा बी येगलाच थाट

पर तिथं मनं हुती मायेची गाठ

मह्या सुताचं मातूर इचारु नगा

मनं हे बी सारं इदन्यानानं झाला.


मह्या मनामंदि साला अजुनबी झमेला

या इदन्यानानं मी सुधारला की

माझा मातेरं झाला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy