माझी मायभूमी
माझी मायभूमी

1 min

1.9K
मांदियाळी वीरांची
मायभू तू दिलीस.
कर्मभूमी संतांची
मला तू दावलीस.
नानाविध नांदती
नानाविध ठिकाणी.
एकसंध बांधिले
मायभू तुजठायी.
धवलता काश्मिरी
मुकुट हिमालयी,
नील कन्याकुमारी
चरण तुजपायी.
माय माऊली माझी
माझी ही मायभूमी
ऋण अनंत तिचे
फेडीन जन्मोजन्मी.
मायभू तुझा ध्यास
मनी सदैव असावा.
जन्मोजन्मी मायभू
साथ तुझाच असावा