STORYMIRROR

Vijay Deshmukh

Romance

4  

Vijay Deshmukh

Romance

प्रीत

प्रीत

1 min
1.3K

सखे प्रीत तुझी माझी,

फुला जसा मकरंद

मन भिडले मनाला,

साता जन्माचा गं संग


सखे तुझ्या प्रीतीपुढं,

वाटे आभाळ ठेंगणं

राणी तुझ्या गं पुढ्यात,

चंद्र सांडीतो चांदणं


सखे हात घेता हाती,

मिटे काळजी जगाची

भिडे डोळा गं डोळ्याशी,

भेट नदी सागराशी


सखे मन गं सैराट,

संगे तुझ्या असण्यानं

होई कावरं बावरं,

संगे तुझ्या नसण्यानं


सखे आपुली गं साथ,

दोन जीव एक श्वास

सांग मला गं साजने,

किती असे हा विश्वास


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

Similar marathi poem from Romance