STORYMIRROR

Vijay Deshmukh

Others

4  

Vijay Deshmukh

Others

मागणे देवा तुला

मागणे देवा तुला

1 min
387

लहानपणीचे ते भावविश्व अन तो निरागसपणा

देवा मला पुन्हा अनुभवायचाय.

आईच्या कुशीत, अन् बाबाच्या मिठीत

परत एकदा हा देह विसावायचाय.


आजीची ती गोष्ट अन आजोबांचा लळा

आजही आहे मनात घर करून,

सांग मला देवा तूच

आम्ही आज ते आणावे कोठून.


दादा खूप खूप रागवायचा

ताई पण ओरडायची,

मात्र डोळ्यातील माझ्या आसवांनी

त्यांचीही माझ्यावरील माया जाणवायची.


मित्रांचा तो गोतावळा

अन एकमेकाप्रतिचा लळा,

परत एकदा पहायचाय

धडा तो बालपणीचा आणखी एकदा गिरवायचाय.


गुरुजनांचा तो निःस्वार्थ धाक,

अन् शाळेतील खडू, फळा, बाक,

देवा मला पुन्हा तसाच पहायचाय

पुन्हा एकदा त्या मातीचा गंध घ्यायचाय.


प्रपंच, दुनियादारी अन् चाकरीचा

आता खूपच कंटाळा आलाय

देवा माझे एक ऐकशील का?

लहानपण माझे मला परत देशील का?


Rate this content
Log in