STORYMIRROR

Vishal patil Verulkar

Abstract

4  

Vishal patil Verulkar

Abstract

सुखाच्या घरी एकदा

सुखाच्या घरी एकदा

1 min
471

सुखाच्या घरी एकदा जाऊन मी बघावं

नकळत सुखाला माझे दु:खही कळावं


येऊन माझ्या जवळ सुखाने घ्यावे मला पोटी

आनंदाचे गाणे गावे अलगद माझ्या ओठी


विसरुन जाऊन दु:ख सारे सुखाने मला विचारावे

मी सदैव राहील जवळ तुझ्या दु:ख तू विसरावे


घेऊन सोबत सुखाला मी बनवेल सुंदर गाव

दु:ख विसरतील सारे राही फक्त सुखाचे नाव


सुखाचं आणि माझं असं जुळावं घट्ट नातं

सुख असेल सोबत माझ्या ना राहील मी अनाथ


भेटेल कुठे सुख मजला मी दु:खाला विचारावे

नांदतो आम्ही एकत्र असे दु:खाचे उत्तर यावे


मी घेईल दु:खाला जवळ त्याला करेल आनंदीत

सुख-दु:ख आणि मी नांदू आम्ही एकत्रीत


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract