बदल आता तरी
बदल आता तरी
कालानुरूप तुला बदललं पाहिजे
वयानुसार तुला सावरलं पाहिजे
तुला आता बदललं पाहिजे।
हळव्या मनाला आवरायला हवं
कठोर मन करायला हवं
तुला आता बदललं पाहिजे।
तू समजतेस तसं नसतं गं
प्रत्येकाचं जग वेगळं असतं गं
तुला आता बदललं पाहिजे।
तुझा काळ वेगळा होता
अज्ञानातही आनंद होता
तुला आता बदललं पाहिजे।
बदल स्वतःला आतातरी
कर निर्धार वज्रापरी
तुला आता बदललं पाहिजे।
कोणी कोणासाठी असतं कां गं
आयुष्यात खूप काही घडतं गं
तुला आता बदललं पाहिजे।
