महिला दिन विशेष
महिला दिन विशेष
1 min
348
सोसून अविरत श्रम
जोडून नात्यांचे बंध
जाणून काळ वेळ काम
सांधते सर्व मने एकसंध।
तुझ्या विशाल पंखाखाली
विश्व हे सारे विसावे
उत्तुंग तुझ्या कार्यापुढे
गगन ही ठेंगणे व्हावे।
माता भगिनी भार्या तू
जिजाऊ सावित्री रमाई
सकलांची भाग्यविधाता तू
हिरकणी जना विठाई।
तुझ्या अखंड मायेखाली
सारे घर अंगण विसावे
असता तुझा सहवास
घर हे हसरे दिसावे।
