गुरु
गुरु
1 min
155
शिक्षक दिन
गुरूंचा आदर
असावे सादर
प्रत्येक दिन
गुरूंची छाया
पालकांत असे
जीवनात वसे
सदैव माया
संस्कार देती
अध्यापन करी
भावार्थ अंतरी
विद्यार्थी घेती
लागतो ध्यास
विद्यार्थ्यांना छान
गुरूंनाही मान
असे विश्वास
शिक्षक भरी
विद्यार्थ्यांचा पाया
जात नाही वाया
विद्यार्थी स्मरी
काढतो नाव
शिक्षकांना गर्व
विद्यार्थ्यांचा सर्व
संस्कार भाव