STORYMIRROR

Vidyadevi deshinge

Others

4  

Vidyadevi deshinge

Others

वसंत ऋतू

वसंत ऋतू

1 min
446

आला हा वसंत ऋतू

उन्हाची लागली चाहूल

झाड झाडं तरारून

पानाफुलांनी मोहरेल।

कोकिळेचे कुंजन दिनभर

आम्रवृक्ष मोहोराने भरला

झाली पानगळ ही सुरू

पांगीरा पळस हा फुलला।

वसंत ऋतूची ही जादू

सृष्टी दिमाखात सजेल

गुलमोहर बकुळी चाफा

सुगंधाची लयलूट करेल।

पानाफुलांचा हा मेळा

साऱ्या सृष्टीत नटला

वसंत ऋतू आल्हाद

रंगोत्सवात खूप रंगला।


Rate this content
Log in