स्वच्छता अभियान गीत
स्वच्छता अभियान गीत
1 min
219
स्वच्छ करू परिसर आपण सारे
रोगराई पळवून लावू आपण सारे।।धृ।।
स्वच्छ सुंदर लख्ख परिसर
तो पाहून मना होई आनंद
शपथ घेऊ स्वच्छ राहू आपण सारे।।१।।
ओला कचरा हा सुका कचरा
वेगवेगळा करू हा सारा
एकत्र येऊ काम करू आपण सारे।।२।।
प्लास्टिक मुक्तीचा करू हा नारा
कापडी पिशवीचा आग्रह धरा
सृष्टी वाचवू प्राणी वाचवू आपण सारे।।३।।
स्वच्छता अभियान यशस्वी करू
मनामनात संकल्प करू
स्वस्थ तन स्वस्थ मन आपण सारे।।४।।
