STORYMIRROR

Vidyadevi deshinge

Others

4  

Vidyadevi deshinge

Others

प्रेम करावे

प्रेम करावे

1 min
573

प्रेम करावे आई वडिलांवर

हसणाऱ्या छोट्या बाळावर

आपल्या बहीण भावांवर

उमलणाऱ्या फुलांवर।

    प्रेम करावे रोपट्यावर

    फांदीवरील पालवीवर

    अंकुरणाऱ्या रानावर

     सळसळणाऱ्या वाऱ्यावर।

प्रेम करावे नात्यावर

हितगुज जोपासणाऱ्यावर

गालावरच्या खळ्यांवर

नभातील ताऱ्यांवर।

      प्रेम करावे कवितेवर 

     उत्स्फूर्त येणाऱ्या शब्दांवर

     अभिव्यक्त मनावर

     स्फुरणाऱ्या गाण्यावर।

प्रेम करावे विद्यार्थ्यांवर

त्यांच्या निष्पाप मनावर

संवेदनशील मनावर

सौजन्यशील आदरावर।

      प्रेम करावे मातृभूमीवर

      रक्षणाऱ्या सैनिकांवर

      संशोधन करणाऱ्यावर

      आपल्या शेतकऱ्यांवर।

प्रेम करावे सृष्टीवर

गडकोट किल्ल्यावर

नदी दरी खोऱ्यावर

सुंदर अश्या निसर्गावर।

       प्रेम करावे मैत्रीवर

       मैत्रिणीच्या नात्यावर

       मित्राच्या साथीवर

       आणि सुख दुःखावर।

प्रेम करावे स्वतःवर

विसरून साऱ्या जगाला

तरच आपण देणार

इतरांना प्रेम आणि प्रेम।


Rate this content
Log in