जात
जात
जन्माला येता मी.. नात्यात अडकत गेलो...
कळले नाही कधी जातीत वाटतो गेलो...
ओळख झाली रंगाची आपलेच वाटले सगळे
नंतर कळले मला जातीने खूप केलेत वेगळे...
शाळेत गेलो मी... मित्र माझे अनेक
कोण होते पाटील तर कोणी होत बेग...
देवाच्या नावाचा टाहो सर्वांनी फोडला
हाच का तो देव ज्याने जातीत आम्हाला वाटला...
आरोप काय करायचा त्याच्यावर तो मात्र दगड...
जातीने तर केली आहे देवावर पण पकड...
रस्त्यावरचा भिकारी मात्र विचारत नाही जात
जे देईल ते खातो काढतो आपली दिनरात...
माणसाची किंमत येथे कोणाला नाही कळली..
होती नव्हती किंमत ती जातीने मात्र मिळवली...
असं वाटतंय....
मेल्यावर गेलो तर वरती घेईन का कोणी आत
कदाचित तिथे ही विचारेन तुझी कोणती रे जात....
