STORYMIRROR

Ankita Kulkarni

Abstract

4  

Ankita Kulkarni

Abstract

फुल गावतातले

फुल गावतातले

1 min
475

गवतात एक छोटे

छान फूल उमलले होते।


हवेवर हळुवार ते,

खुशीत झुला झुलत होते।


मना माझ्या मोहून,

ते खूप भावले होते।


स्पर्शुनी त्या जवळी,

मी हळुवार लवंडले होते।


गोड हसूनी गालात,

मजशी ते बोलत होते।


इतके मासूम, मुलायम,

खोडकर, खट्याळ होते।


त्या सवे खेळण्यात,

मी खूप दंगले होते।


हिरव्यागार गालिच्यावर,

मी शांत निजले होते।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract