लोक काय म्हणतील?
लोक काय म्हणतील?
सर्वात मोठा
रोग जडला
लोक काय
म्हणतील याला.......
काहीही करा
आपण वेगळे
कोणाला काही नसते
सोवळे ओवळे.....
कोण काय म्हणेल
याचा सतत विचार
अती नम्रपणा आणि
भयाण शुद्ध आचार.....
अती काम करता
जाते ते लयाला
अती राग येता
कारण होते भीतीला....
लोक काय म्हणतील
विचार द्या सोडून
आता ऐका मनाचं जरा
काम करा अंतरातून.....
