असतेस समीप तू ..!
असतेस समीप तू ..!
समीप असणे सहजतेने
सुख इतके सुलभ नसते
दूर दूर दोघे असतो आपण
हसरी तसबीर मग आनंद देते …!
हसरे चित्र तुझे पाहणे सखे
आनंद दिलासा देणारा असतो ,
दूर आहेस, असतेस समीप तू
सहवास असाही सुखद असतो...- !
नितळ भाव नजरेतले तुझ्या
चेहेरयावरी मधुर स्निग्धता
सांगे तुझा आपलेपणा
तुझ्या स्मितातली अस्फूटता ...