तू गेल्यापासून...
तू गेल्यापासून...
एक भकास सकाळ
उदास दुपार
भरकटलेली संध्याकाळ
अन विरहाची रात्र
असच हल्ली जीवन झालाय
वाऱ्यावर भरकटणा-या पाचोळ्याप्रमाणे
माझ्यासोबत तेही भरकटच चाललंय
कस सांगू तुला
तू गेल्यापासून सार काही सुनं झालंय...
जोडून दुःखाच्या राशी गाठीला
आयुष्यातून सुख उणं झालंय
हल्ली गुलाबाला पाहून
लाज येत नाही गाली
केवड्याच्यासुवासात ना मज मन गुंतते
अश्रू गळते सांजवेळी
तेजातून बरसणाऱ्या सरीवर
आज अंधार पसरलय
खळखळणार हसू माझ
अश्रूत विखुरलंय
माझं मीपण माझ्यात ना उरलाय
तू गेल्यापासून सर काही सुनं झालंय
जोडून दुःखाच्या राशी गाठीला
आयुष्यातून सूख उणं झालंय