तुझ्यात जीव रंगला
तुझ्यात जीव रंगला
तुझ्यात जीव गुंतला कधी
माझे मलाच कळले नाही...
तुझ्याकडे मी ओढला गेलो
आणि मग अप्रूप घडले काही...
केले कित्तेक असफल ते प्रयत्नही
स्वतःला दूर प्रेमापासून ठेवण्याचे जरी मी...
हरघडी हरक्षणाला तुझ्यातच हरवलो
दूर पळण्याचा केला खटाटोप जरी मी..
जाणीव वेड्या माझ्या मनाची
कोवळ्या तुझ्या काळजाला झाली कशी?
तो तर होता सहजचा एक इशारा
मग इतक्यात तुही जवळ आली कशी..?
झाले शक्य तर थांबव आता खेळ हा
शब्दांत माझ्या तुझे विरून जाणे..
आज जरी आल्हाददायक हे बाहुपाश माझे
उद्या व्हायला नको तुलाच गुदमरणे
संथ काळजातल्या उदकाचा सखे
नको ठाव घेऊ तू टाकुनी खडा..
बदललेल जेव्हा हा प्रवाह दिशा.
हृदयातल्या पाखराचा होईल तडफडा...
मी ग वारू हौसीबाज
निरनिराळा मज आवडे घास..
आता मात्र जीव तुझ्यात रंगला आणि
जीवालाही लागली तुझीच आस..