कष्टाचे महत्व
कष्टाचे महत्व
केल्याशिवाय मिळत नाही
सर्वांना कष्टाची भाकरी
दिनरात राबती सगळे
करीती दुस~याची चाकरी
कष्टाच्या पैश्याला प्रमाणिकपणाचा वास
मिळते सुखद शांततेची झोप
होई सर्व संकटातूनी सुटका
नसे कोणावरी कोणाचा कोप
मिळते फळ उशीरा कष्टाचे
सत्याला असते प्रकाशाची साथ
हरूनी झळेल रान असत्याचे
सत्यच जिंकते असत्याला देवूनी मात
कष्टाशिवाय मिळणार नाही भाकरी
कष्टाला असावे जीवनात महत्व
कुठेही करा तुम्ही कोणतीही चाकरी
कष्टावरच आहे स्वतःचे अस्तित्व
