अर्थ प्रेमाचा
अर्थ प्रेमाचा
जेव्हा कळला अर्थ प्रेमाचा
विश्वास वाढला या मनाचा
तरीही वाटते तुला भेटावे
फुगा फोडण्या ह्या प्रेमरूपी शंकेचा....
तू असता हुरहूर
तू नसता काहूर
आसमंती हरवला निनाद
अन
वाऱ्यासवे भरकटलेले सूर
अंदाज आलाय मज थोडा थोडा या हुरहुरीचा
तरीही वाटते तुला भेटावे
फुगा फोडण्या ह्या प्रेमरूपी शंकेचा....
दिवसा रातीचा भास
क्षणात आनंद क्षणात उपहास
मना लागती तुझा ध्यास
असा जगतोय मी दिलखुलास
हुरूप चढलाय मज जगण्याचा
तरीही वाटते तुला भेटावे
फुगा फोडण्या या प्रेमरूपी शंकेचा...