Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Abasaheb Mhaske

Romance

2  

Abasaheb Mhaske

Romance

तुझ्या आठवणींशिवाय...

तुझ्या आठवणींशिवाय...

1 min
7.0K


तुझ्या आठवणींशिवाय... कुठलाच दिवस उगवत नाही

अन रात्रही सरते तुझ्या प्रतीक्षेत कूस बदलून ...

तुझ्या आठवणींची शिदोरी ...सरतही नाही नि पुरत ही नाही

कितीही नाही म्हटलं तरी संपता संपत नाही दिस ,मास , वर्ष 

तसं पाहिलं तर तुझंच खरं वाटत कधी - कधी ...

स्वप्नच का पाहावं ते जे कधीच पूर्ण होणार नाही

तुझंही खरंच आहे म्हणा एका अर्थाने ...

का धावावं उगाचंच स्वप्नांच्या पाठी ?

हो ग पटतंय मलाही हे सगळं म्हणणं तुझं पण ...

सवयच जडलीय ना मला स्वप्नापाठी धावण्याची

पोट हातावर घेऊन , उंच आकाशात भरारी मारण्याची

अन पुन्हा तुझ्याच स्वप्नात रमण्याची ....

खूप सोप्प असत ग प्रेम करणं वाटलं होत

आज कळत किती किंमत मोजावी लागते प्रेमाची ...

किती भोगाव्या यातना? कुठवर या प्रेमभंगाची ...

छळते तुझी आठवण तुझ्या असण्या - नसण्याची...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance