वसा मदतीचा
वसा मदतीचा
आज सकाळी एक वृद्धा
दरवाजा मध्ये उभी असे
नऊ दिवसांच्या पारण्यासाठी
देतेस का काही पुसतसे
नैवेद्य माझा झाला होता पण
देवीला नव्हता केला अर्पण
वृद्धा कसं नुसे करू लागली
खूप भुकेली दे मज जेवण
मजसी आता प्रश्नची पडला
देवाला पाहू का जीवाला पाहू
देवीला अर्पण करण्याआधी
अन्न कसे वृद्धेला देऊ
आठव आला मजसी
संत एकनाथांचा
तहानलेल्या गाढवाला
गंगाजल पाजण्याचा
मग मी मनात निश्चय केला
वृद्धेलाच त्या द्यावे अन्न
भुकेल्याची भूक जाणता
देवही होतो मग प्रसन्न
मनापासून ती वृद्धा जेवली
अंतरंगी तृप्त तृप्त झाली.
काय सांगू मग पुढचे कौतुक
तिच्या जागी मजा आंबा दिसली
अंबा राणी माता राणी
आली माझ्या घरी पाहुनी
तृप्त झाली भाव पाहुनी
नैवेद्याचे अन्न जेऊनी
बाळे मी तुझ्यावर प्रसन्न
काय हवे ते माग मजसी
देव देव ठेवुनी मागे
भुकेल्याची तू भूक जाणसी
मागणे काही नाही माते
सदैव तुझी कृपा राहू दे
रंजलेल्यांना मदत करण्याचा
वसा सदैव मनी वसू दे
