दुष्काळ
दुष्काळ
थेंब नाही पाणी । तप्त ही धरणी ।
निसर्ग करणी । पेरलेली।।
कष्टूनी मातीत । करपा शेतात।।
भूक ही पोटात । पेटलेली ।।
तळी ती कोरडी । तहान नरडी ।।
दुष्काळी तिरडी । टांगलेली ।।
नदी ही आटली । बाग ही पेटली।।
रिकामी ताटली। वाढलेली ।।
माहोल दुष्काळी । पोटी नाही पोळी।।
उपवास गोळी । ठरलेली ।।
काळजी जीवास । कुठे शोधू घास ।।
जगण्याची आस । उरलेली ।।