आंबा
आंबा
अमृताचे फळ / दिसते सुंदर
लटके झुंबर / आम्रवृक्षा ।।
फळाचा हा राजा / लय गोड भारी
त्याची मजा न्यारी / काय सांगू ।।
हापूस केशर / चवीला आगळा
दिसाया वेगळा / रंग त्याचा ।।
वरून हिरवा / आतून पिवळा
अंतरी भावला / मनोमनी ।।
दुरवर चाले / सुगंध वासाचा
गोडवा रसाचा / मगकळे ।।
खावे गुळ आंबा / गुळाहूनी गोड
लागे हो आवड / माझ्या मना ।।