आई
आई
रक्त मासाच्या गोळ्याला
जपून ठेवले तू पोटात
सोसून कित्येक यातना
आणले मला जगात
जन्म दिलासा कष्ट सोसुनी
दुःखास सर्व दूर लोटूनी
घडवलस मला प्रेम देऊनी
कधी न फिरणारे ऋण करुनी
आई तुला आकाशाची उपमा कशी देऊ ?
कारण तुझे मन त्यापेक्षाही विशाल आहे
आई तुला सागराची उपमा कशी देऊ ?
कारण
तुझे मन त्यापेक्षा ही खोल आहे
आई तू आहेस एक आत्मरुप ईश्वर
आई तुझ्यासाठी शब्दच कोठे आहेत
जे काही मज जवळ आहे
ते सगळं फारच अर्थवट आहे
आईच आपली भगवद गीता
वंदन करू आपण तिला
तुझ्या ऋणात मी रहावे
परत फेडीसाठी ऋणाच्या
पुन्हा तुझ्याच पोटी जन्मा या
