STORYMIRROR

Tushar Chandrakant Mhatre

Inspirational

4  

Tushar Chandrakant Mhatre

Inspirational

ह्या क्षितिजाने

ह्या क्षितिजाने

1 min
24K

दाटीवाटीच्या जमिनीवरची निरंतर व्यथा माझी

अंधाराच्या वाटेवरची अडखळती कथा माझी

ह्या क्षितीजाने ह्या प्रवासाला दिशा द्यावी

आणि ह्या वाटेतूनी जीवनाची निशा सरावी...


कोणते गीत, कोणते संगीत असावे?

किलबीलाटातही मधुर सूर दिसावे

ह्या क्षितीजाने ह्या प्रवासाला कंठ द्यावा

आणि ह्या वाटेतूनी आनंदाचा पंथ गावा


पाहता हा उष्ण ऋतू माझ्या नित्याचा

आभास मनोहर व्हावा परि चैतन्याचा

ह्या क्षितीजाने ह्या प्रवासाला मार्ग द्यावा

आणि ह्या वाटेतूनी जीवनाचा स्वर्ग व्हावा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational