‘बाप’ म्हणजे कोण असतो?
‘बाप’ म्हणजे कोण असतो?


‘बाप' म्हणजे कोण असतो?
जीवापाड लेकीवर प्रेम करतो,
भडकू-तडकू फारच असतो,
पण शेवटी तो एक बापच असतो
‘बाप' म्हणजे कोण असतो?
लेकीला फुलासारखा जपणारा असतो,
तिची चेष्टा, तिला राग येईपर्यंत करतो,
पण शेवटी तो एक बापच असतो
‘बाप' म्हणजे कोण असतो?
लेकीची स्वप्न धडपड करून पूर्ण करतो,
खिशात पैसे नसले तरी तो दाखवत नसतो,
पण शेवटी तो एक बापच असतो
‘बाप' म्हणजे कोण असतो?
लेकीला आनंदी पाहण्यासाठी तो दिवस-रात्र कष्ट करतो,
तिचं धुम-धडाक्यात लग्न लावतो,
पण शेवटी तो एक बापच असतो
‘बाप' म्हणजे कोण असतो?
लेकीला सासरी पाठवताना सगळ्यात जास्त रडतो,
पण तिला याची भणकसुद्धा लागून देत नसतो,
पण शेवटी तो एक बापच असतो