STORYMIRROR

sneha menezes

Inspirational

4  

sneha menezes

Inspirational

तू जरा सा थांब

तू जरा सा थांब

1 min
23.6K

पक्ष्यांना पंख पसरू दे

आकाशात उंच भरारी घेऊ दे

तू जरा सा थांब


प्राण्यांना निसर्गात बागडू दे

मोकळेपणाने नाचू दे

तू जरा सा थांब


झाडांना नवी पालवी फुटू दे

वाऱ्याच्या झुळुकेवर डोलू दे

तू जरा सा थांब


पाण्याचा गाळ सरू दे

नद्यांना स्वछंदी वाहू दे

तू जरा सा थांब


ढगांना स्वच्छ होऊ दे

ताऱ्यांना थोडंसं चमकू दे

तू जरा सा थांब


पृथ्वी पुन्हा आनंदी होऊन हिरवीगार होऊ दे

मोकळा श्वास घेऊन नव्याने बहरू दे

फक्त तू जरा सा थांब….


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational