ती
ती
1 min
398
मोह तिचा असा काही
ज्यात गेलो मी हरवूनी
दिवस-रात्र तिच्या संगी
माझे सर्वस्व अर्पुनी
हवी आहे फक्त ती आणि तीच,
दुनियेची फिकीर नाही
माझ्यात ती, तिच्यात मी,
भान हरपुनी जाई
जगाने सांगितले दे तिला सोडूनी
ते शक्य नव्हते तिच माझी मदिरा मोहिनी
चाललो होतो बाटली घेऊन एका रम्य संध्याकाळी
जाता जाता रस्त्यात भेटली एक गोड़ चिमुकली
हातात बाटली बघून मला म्हणाली
"का पिता हो त्यातलं पाणी?
वाट पाहाते का वर कोणी?
देवाला भेटण्याची इतकी का हो घाई?
आयुष्य दिलंय त्यांनी या सुंदर जगी
हेच पाणी पिऊन बाबा गेले देवा घरी
त्यांना भेटता येईल का पिऊन हे पाणी?
येते त्यांची आठवण प्रत्येक क्षणी”
ऐकताच हे हातातून बाटली पडली, दारू सुटली
त्या वाक्याने परिवर्तन झालं माझ्या मनी…
