मी राजमाता जिजाऊ
मी राजमाता जिजाऊ
मी राजमाता जिजाऊ....
क्रांतिनंतरची उषःकाल आज नव्यानेच पाहिली होती
धकाधकीच्या जीवनात माझी जयंती तेवढी लक्षात होती
मग मीच, समाजाशी बोलावे म्हणून स्मरला भूतकाळ माझाचं
कोणं मी? स्वतःला विचारत आज चाळले इतिहासाचे पुस्तकं,
पुन्हा आठवल्या त्या गर्द आठवणी कलियुगाच्या पसार्यात..
राष्ट्रमाता, राजमाता, जाधवांची मी जिजाऊ,
अराजकतेच्या पार्श्वभूमीवर मूर्तिमंत शिवराज्याचं स्वप्न मी जिजाऊ.
बालपणीच युध्दकला राजनितीत परिपक्व
चूल आणि मूल नाही तर तलवार आणि भाला माझं तत्त्व...
आज या शिवराज्यात असंख्य औरंगजेबाचा उच्छा
द मांडलाय,
माझ्याच भूमीत आज माझी आई बहीण बळी जातायं....
मराठी अमराठी वाद तर सगळीकडेच मांडलाय,
सुधारणेने जणू आता परकीय विजा कायमस्वरूपी काढलायं.
टेबलाखालून खाऊन राजकारणाने सारा खेळ मांडलाय,
हिरवा, केशरी वादात अख्खा भारत आज गुरफटलाय...
कसं सांगू आता तुम्हाला, तुम्ही माझीच तर लेकरे आहात...
परावलंबी नाही, तर शिवछत्रपतींचे स्वावलंबी मावळे आहात..
हतिहास जिवंत ठेवा एवढीच आशा करते
धाडसाचे बीज पेरुन निरोप आता घेते ,
पुन्हा येईन एका उषःकाली तुम्हास भेट द्यावया
तेव्हा घराघरांत वावरेल जिजाऊ राजमाता...