मी अनुभवलेला पाऊस
मी अनुभवलेला पाऊस


रोहिणी नक्षत्राची सुरुवात
झाली, आकाशात ढग आले ढग आले
मतलई वारे वाहू लागले,
पावसाची चाहूल झाली
बळीराजाची चाले घाई, आकाशाकडे
बघत जाई, बघत जाई
सगळीकडे विजा चमकल्या,
पावसाची सुरुवात झाली
बळीराजाने केली मशागत,
भूमातेच्या गर्भात बी पेरलं
पावसाने हजेरी लावली,
भूमातेच्या गर्भातून अंकुर आले
बळीराजा पावसात सुखावून,
ओलेचिंब झाला ओलेचिंब झाला
डोंगर दऱ्या वाहू लागले,
सौंदर्याने फुलू लागले
आला आला श्रावण महिना,
श्रावण सरी बरसू लागल्या
रोहिणी नक्षत्राची सुरुवात
झाली, आकाशात ढग आले ढग आले