STORYMIRROR

Asmita Rajesh Meshram

Inspirational

4  

Asmita Rajesh Meshram

Inspirational

पंख

पंख

1 min
387

मनात आले काहीतरी

अन.. उडाली चिमणी आकाशात 

'स्वतःला शोधायचे' म्हणून

घेतली भरारी गगनात .. 


आयुष्य काढले एका घरट्यात .. 

पण आज ते जग बघणार , जे 'म्हणे' नाही आवाक्यात .. 


पंखात कुणास ठाऊक, कसे एवढे बळ आले..

डोळे भरून घरट्याला म्हणाली "आज मी निघाले".. 


जायचं होतं क्षितीजाच्या पलीकडे .. 

मनाला बांधून नाही बघायचं आयुष्याकडे.. 

ते नवे जग 'स्वप्ना'प्रमाणे उलगडवायचे.. 

येणाऱ्या आयुष्याचे कडू गोड रंग चाखायचे.. 


मलाही ओढ लागली होती.. इंद्रधनूला ओढायची.. 

स्वछंद हवेत 'परत एकदा'.. मोकळा श्वास घ्यायची.. 


बस झाला आता.. 'जगणयासाठीचं' जगणं.. 

आयुष्याच्या गराड्यात स्वतःला खेचतं राहणं.. 


तळ्याकाठी बसून आज जेव्हा.. स्वतःचेच प्रतिबिंब सुंदर भासले.. 

हरवलेली मीच जणू परत स्वतःला गवसले...


Rate this content
Log in

More marathi poem from Asmita Rajesh Meshram

Similar marathi poem from Inspirational